मुंबई महानगराची दुसरी लाइफ़लाईन असलेली बेस्ट बसेस ची लवकरच भाडेवाढ होवू शकते. मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत भाडेवाढीच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव बीएमसी च्या मंजुरीनंतर लागू करण्यात येईल. सतत काही वर्षांपासून बेस्ट परिवहन विभाग तोट्यात आहे. ज्यामुळे एवढी बिकट परिस्थिती आहे कि बेस्ट कर्मचार्यांच्या पगारासाठी सुद्धा बेस्ट परिवहन विभागाला कोट्यावधी रुपयांचे कर्ज घ्यावे लागले आहे. म्हणून बेस्ट विभागाला ह्या कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 6 किलोमीटर पर्यंत भाडेवाढ केली जाणार नाही, परंतु 6 किलोमीटर नंतर चे भाडे 14 रुपयांवरून 16 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. दुरस्त मार्गावरील विध्यार्थ्यांसाठी मासिक पास चे पैसे 100 रुपयांवरून 200 रुपये करण्यात येणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews